कोहलीने धोनीबाबत केला आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाला, माही भाईने…

Virat Kohli On MS Dhoni : विराट कोहलीची (Virat Kohli) गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी (Team India) अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली विराटने पदार्पण केले. दोघांचे नाते कोणापासून लपलेले नाही. आता विराटने त्याच्या आयपीएल टीम आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल मोठे खुलासे केले आहेत. त्याचबरोबर त्याने धोनीबद्दल एक मोठी गोष्टही सांगितली आहे.

विराट कोहली म्हणाला की, पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma), संपूर्ण कुटुंब, बालपणीचे प्रशिक्षक, महेंद्रसिंग धोनी ही एकमेव व्यक्ती होती जी वाईट काळात माझी ताकद बनली. कोहलीने 2008 ते 2019 अशी 11 वर्षे धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली. कोहली म्हणाला की, महेंद्रसिंग धोनीला ओळखणे हा बहुमान आहे, कारण कोणीतरी तुमच्यापेक्षा खूप अनुभवी आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीकडून शिकायला मिळते.

आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो. कोहली पुढे म्हणाला की, धोनीशी संपर्क साधणे खूप कठीण आहे. जर मी त्याला कॉल केला, तर तो उचलणार नाही अशी 99 टक्के शक्यता आहे कारण तो त्याचा फोन पाहत नाही. मी त्याच्याशी दोनदा फोनवर बोललो आहे.