कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुक : मतमोजणीच्या सातव्या फेरीत जाणून घ्या कोण आहे पुढे ? 

कोल्हापूर –  कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला( Kolhapur North by-election polls) सुरुवात झाली आहे.  मुख्य लढत ही भाजप आंनी कॉंग्रेस मध्येच होत असून भाजपकडून सत्यजित कदम(satyajeet kadam)  तर कॉंग्रेसकडून जयश्री जाधव(jayashree jadhav)  मैदानात आहेत.

दरम्यान, एकूण 26 पैकी 7 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाल्या असून सातव्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव 9676 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 3632 मते तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 2431 मते मिळाली आहेत. सातव्या फेरीत जयश्री जाधव यांना 1201 मतांची आघाडी मिळाली आहे.

दरम्यान,  कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. अण्णांच्या माघारी कोल्हापूरकरांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. विजयाचं चिन्ह दिसत आहे. अण्णांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीत उतरले, त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन, अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी तिसऱ्या फेरीतील आघाडीनंतर दिली.