कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुक : मतमोजणीच्या दहाव्या फेरीत  जाणून घ्या कोण आहे पुढे ? 

 कोल्हापूर –  कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला( Kolhapur North by-election polls) सुरुवात झाली आहे.  मुख्य लढत ही भाजप आंनी कॉंग्रेस मध्येच होत असून भाजपकडून सत्यजित कदम(satyajeet kadam)  तर कॉंग्रेसकडून जयश्री जाधव(jayashree jadhav)  मैदानात आहेत.

दरम्यान,दहाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 2868 मते तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 3794 मते मिळाली.  या फेरीत सत्यजीत कदम यांना 926 मतांची आघाडी मिळाली आहे तर दहाव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना एकूण 8073 मतांची आघाडी आहे.

दरम्यान,  कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. अण्णांच्या माघारी कोल्हापूरकरांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. विजयाचं चिन्ह दिसत आहे. अण्णांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीत उतरले, त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन, अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी तिसऱ्या फेरीतील आघाडीनंतर दिली.

काँग्रेसचे आमदार आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपकडून मात्र सत्यजित कदम यांना चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पोटनिवडणुकीत एकूण १५ उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, मुख्य लढत मात्र जयश्री जाधव आणि सत्यजित कदम यांच्यातच झाली आहे.

सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील या दोघांनी ही पोटनिवडणूक वैयक्तिक दृष्ट्या प्रतिष्ठेचा विषय केला होता. त्यामुळे दोन्ही बाजूंनी दिग्गजांना प्रचारात उतरविण्यात आले होते. महाआघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले यांनी किल्ला लढवला, तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या.