कुणाल गांजावाला-निक शिंदेचं साउथ इंडियन ठेक्याचं भन्नाट पोरगी गाणं झालं रिलीज

कुणाल गांजावाला-निक शिंदेचं साउथ इंडियन ठेक्याचं भन्नाट पोरगी गाणं झालं रिलीज

मुंबई – ब-याच कालावधी नंतर सुप्रसिध्द बॉलीवुड गायक कुणाल गांजावाला ह्यांनी एक भन्नाट मराठी गाणं गायलं आहे. हे गाणं 1 मिलियनहून अधिक मराठी इन्फ्ल्युएन्सर असलेला अभिनेता निक शिंदेवर चित्रीत झालेलं आहे.एस प्रॉडक्शन निर्मित, सचिन कांबळे दिग्दर्शित, ‘भन्नाट पोरगी’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्याचे गीत-संगीत सुप्रसिध्द संगीतकार जोडी कुणाल-करण ह्यांचे आहे. कुणाल गांजावाला आणि सोनाली सोनावणेने गायलेले हे गाणं निक शिंदे आणि सानिका भोईतेवर चित्रीत झालेले आहे. ह्या गाण्याचं वैशिष्ठ्य म्हणजे मराठी, कोकणी, कन्नड अशा तीन भाषांचा मिलाफ ह्या गाण्यात पाहायला मिळतोय.

एस प्रॉडक्शनचे निर्माते अजय अंकुश पाटील म्हणाले, ”इसक झालं रं ह्या रोमँटिक गाण्याला 10 मिलीयनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. त्यामुळे दुसरं गाणंही धमाकेदार आणण्याचा विचार चालू असतानाच कुणाल-करणने मला भन्नाट पोरगी गाणं ऐकवलं. आणि ऐकताक्षणीच ठेका धरायला पटकन भाग पाडणा-या ह्या गाण्याची निर्मिती करायचा मी विचार केला.”कुणाल-करण ह्यांनी पहिल्यांदाच बॉलीवुड गायक कुणाल गांजावाला ह्यांच्यासोबत काम केलं आहे. त्या अनुभवाविषयी कुणाल-करण सांगतात, “साउथ इंडियन बाजाचं मराठी गाणं आहे, आणि सुप्रसिध्द गायक कुणाल गांजावाला ह्यांचा आवाज ह्या गाण्यासाठी चपखल बसेल असं वाटल्याने कुणालसरांना आम्ही संपर्क साधला. संगीतकाराला नक्की काय लकबी अपेक्षित आहे, त्याप्रमाणे गाण्याची कला त्यांच्यात अप्रतिम आहे.

”सुप्रसिध्द गायक कुणाल गांजावाला म्हणाले,” मराठी, कोकणी, कन्नडा अशा तीन भाषांचा मिलाफ असलेलं रोमँटिक गाणं आहे. नावाप्रमाणेच गाणं भन्नाट आहे. नवीन संगीतकारांसोबत गाण्याचा अनुभव खूपच चांगला होता.”गायिका सोनाली सोनावणे म्हणते,” कुणाल गांजावाला ह्यांची मी फॅन आहे. ज्यांची गाणी ऐकत लहानाचे मोठे झालोय, त्यांच्यासोबत डुएट गाणं गाण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अविस्मरणीय बाब आहे. कुणाल गांजावाला ह्यांच्यासोबत हे माझं पहिलंच गाणं आहे. सध्या साउथ गाण्यांची तरूणाईमध्ये क्रेझ आहे. त्यामुळे साउथ ठसक्याचं हे गाणं सर्वांना आवडेल, असा मला विश्वास आहे.”भन्नाट पोरगी गाण्याचं दिग्दर्शन अनेक सुपरहिट म्युझिक व्हिडीयोचे दिग्दर्शक सचिन कांबळे ह्यांनी केलंय. ते म्हणतात,”दाक्षिणात्य ठेक्यावरचं मराठी गाणं असल्याने साउथ इंडियन मुलगी आणि मराठी मुलाची एक रोमँटिक लव्हस्टोरी ह्यात आम्ही चित्रीत केली. गाण्यात डान्स करताना खूप एनर्जीची आवश्यकता होती. त्यामुळे निक-सानिकाची निवड करण्यात आली..

”निक शिंदे गाण्याविषयी सांगतो, हा माझा सहावा म्युझिक अल्बम आहे. मी पहिल्यांदाच एवढा भन्नाट डान्स केलाय. गाण्यातल्या एका सिक्वेन्समध्ये मला लुंगी घालून डान्स करायचा होता. खरं तर, साउथ सिनेमांचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यांना लुंगी घालून नाचताना पाहताना मलाही तसं नाचावसं वाटायचं. पण जेव्हा मला लुंगी घालून नाचायचं होतं.तेव्हा मात्र मी खूप अवघडल्यासारखा झालो होतो. पण हे एवढं एनर्जेटिक गाणं करून खूप मजा आली.”सानिका भोइटे म्हणते, मी ह्याअगोदर हुरपरी आणि रूप साजरं असे दोन म्युझिक व्हिडीयो केले होते. पण पहिल्यांदाच एवढा एनर्जेटिक डान्स नंबर केला. गाण्याचा अनुभव खूपच आठवणीत राहण्यासारखा होता. 

Previous Post
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने घेतला 'हा' मोठा निर्णय

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Next Post
sharad pawar - supriya sule

‘पुत्रीच्या प्रेमापोटी अनील देशमुखला गृहमंत्री बनवले जाते आणि महाराष्ट्राची प्रतिमा देशात खराब होते’

Related Posts
Sunil Tatkare | मी खासदार झाल्यास मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जातील

Sunil Tatkare | मी खासदार झाल्यास मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जातील

Sunil Tatkare | माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला… येणार्‍या संकटांना सामोरे जावून पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक…
Read More
शिक्षणासाठी तरुण बनला चोर! इंजिनिअरिंगची फी भरण्यासाठी तरुणाने लुटलं मोबाईलचं दुकान

शिक्षणासाठी तरुण बनला चोर! इंजिनिअरिंगची फी भरण्यासाठी तरुणाने लुटलं मोबाईलचं दुकान

अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याला नवी मुंबई पोलिसांच्या (Mumbai News) गुन्हे शाखेने अटक केली आहे. वास्तविक, त्याला मोबाईल फोनच्या…
Read More
पक्षाची भरभराट व्हावी यासाठी पुण्यातील कॉंग्रेस भवनमध्ये होम-हवन

पक्षाची भरभराट व्हावी यासाठी पुण्यातील कॉंग्रेस भवनमध्ये होम-हवन

Pune News : पक्षाची भरभराट व्हावी, पक्षातील गटातटात एकी व्हावी, यासाठी ‘सर्व सिद्धी’ पुजा करून होम-हवन करण्याची घटना…
Read More