कुणाल कामरा हा वाह्यात बोलणारा विकृत माणूस – Manisha Kayande

कुणाल कामरा हा वाह्यात बोलणारा विकृत माणूस - Manisha Kayande

मुंबई ( Manisha Kayande) | शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री कोट्यवधी बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांची गाण्यातून बदनामी करणाऱ्या कुणाल कामरा या विकृत कलाकाराविरोधात शिवसेना आमदारांनी आज विधान भवन परिसरात आक्रमक घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अवमानाबाबत कुणाल कामरावर सरकारने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली.

शिवसेना आमदारांनी विकृत कुणाल कामराविरोधात घोषणाबाजी केली. कामराचा बोलविता धनी कोण याचा सरकारने शोध घ्यावा, अशी मागणी केली. कुणाल कामराचे गाणं व्हायरल झाल्यानंतर रविवारी रात्रीपासून कामरा विरोधात शिवसैनिकांनी विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खार पोलीसांत जाऊन या प्रकरणी तक्रार केली. कामरा याचा स्टुडिओ अनधिकृत असल्यास त्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आणि मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे (Manisha Kayande) म्हणाल्या की, कुणाल कामरा हा वाह्यात बोलणारा विकृत माणूस आहे. यापूर्वी देखील कामरा याने अशीच विकृती दाखवली होती. माननीय एकनाथ शिंदे यांचा एक शेतकरी पुत्र, रिक्षावाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा जीवन प्रवास काही नतद्रष्ट लोकांच्या डोळ्यात खुपतोय, त्यामुळे अशा विकृत लोकांला हाताशी धरुन उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी केली जात आहे, असे आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या. काही लोक सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेत त्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रगती खटकतेय. एक सर्वसामान्य शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री बनला हे आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच आवडले असते, असे आमदार कायंदे म्हणाल्या. आरजे मलिष्का, अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यावर महाविकास आघाडी सरकारने सुडापोटी कारवाई केली होती. तेव्हा संविधान नव्हते का, शोच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला शिवीगाळ करणे, निंदा करणे ही कला आहे का असा सवाल आमदार ड़ॉ. कायंदे यांनी उपस्थित केला.

कुणाल कामरा याने नाक घासून माफी मागावी आणि वादग्रस्त गाणे सोशल मिडिया हँडलवरुन डिलीट करावे असा इशारा आमदार डॉ. कायंदे यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या की, स्टॅंडअप काँमेडीवर सेन्सॉरशीप असायला हवी. संविधान हातात घेऊन ज्यांनी निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवले त्यांचे खरे चेहरे आज समोर आले. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामराची पाठराखण केली. उबाठाचे कार्यकर्ते संपले म्हणून एका कॉमेडियनची मदत घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, अशी खरमरीत टीका आमदार डॉ. कायंदे यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

कोणी अजित पवारांच्या वाटेला का जात नाही? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

ईदचं निमित्त साधून ‘सौगात-ए-मोदी’द्वारे भाजप ३२ लाख मुस्लिम कुटुंबांना भेट देणार

शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, पण फक्त ४ जागांमुळे तुटली होती भाजपसोबतची युती

Previous Post
खासगी विकासक व ट्रस्टमधील करार सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

खासगी विकासक व ट्रस्टमधील करार सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

Next Post
राहुल गांधींचे नागरिकत्व अडचणीत? दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले, "हस्तक्षेप करू..."

राहुल गांधींचे नागरिकत्व अडचणीत? दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले, “हस्तक्षेप करू…”

Related Posts
Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला 'चैतन्यस्पर्श' अभूतपूर्व सोहळा

Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

पुणे : भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर (Lahu Balwadkar) यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे ‘चैतन्यस्पर्श’ हा…
Read More

स्वर युगाचा अंत झाला; मातृतुल्य आशीर्वाद हरपला – मुख्यमंत्री 

मुंबई :- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला…
Read More
Nirmala Sitharaman | करप्रणाली संदर्भात केंद्राची मोठी घोषणा, ‘इतक्या’ लाखांपर्यंत एक रुपयाही कर नाही

Nirmala Sitharaman | करप्रणाली संदर्भात केंद्राची मोठी घोषणा, ‘इतक्या’ लाखांपर्यंत एक रुपयाही कर नाही

2024-25 या आर्थिक वर्षासाठी 2024-25 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाचा ( Nirmala Sitharaman) दिवस आला आहे. आज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन…
Read More