लालू प्रसाद यादवांना किडनी डोनेट करतेय त्यांची मुलगी, जाणून घ्या एका किडनीवर निरोगी राहण्यासाठी काय आवश्यक असते?

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद (Lalu Prasad Yadav) यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य ही त्यांना तिची एक किडनी दान करणार आहे. या महिन्याच्या अखेरीस त्यांचे किडनी प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. रोहिणीप्रमाणेच, अनेक कुटुंबातील अनेक सदस्य आपल्या प्रिय व्यक्तीला वाचवण्यासाठी त्यांचे अवयव दान करतात, त्यामुळे दात्याला त्याची एक किडनी दान (Kidney Donation) केल्यानंतर निरोगी राहण्यासाठी काय आवश्यक असते?, कोण-कोण आपली किडनी दान करू शकतो?, याबद्दल आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत.

डॉ. माधुरी जेटली, असोसिएट कन्सल्टंट, नेफ्रोलॉजी विभाग, पारस हॉस्पिटल, गुरुग्राम यांच्या मते, जर तुम्ही किडनी दान केली तर भविष्यात किडनी निकामी होण्याचा धोका किंचित वाढू शकतो. तथापि, याची शक्यता फारच कमी आहे. तुमची किडनी दान करण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण वैद्यकीय तपासणी करावी लागेल.

चाचणीनंतर, तुमची किडनी प्राप्तकर्त्यासाठी योग्य आहे की नाही? हे डॉक्टर सांगतील. याशिवाय, तुम्हाला अशी कोणतीही आरोग्य समस्या तर नाही ना हे देखील तपासले जाते, जे किडनी दान केल्यानंतर वाढू शकते.

अशा प्रकारे किडनी काढली जाते
किडनी काढण्याची शस्त्रक्रिया किंवा नेफ्रेक्टॉमी सामान्यतः लॅपरोस्कोपिक तंत्र वापरून केली जाते. त्यामुळे दात्याला रक्तस्त्राव किंवा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होतो. किडनी दाते किडनी दान केल्यानंतर सहसा तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर बरे होतात, त्यांना कोणतीही समस्या जाणवत नाही. एक किडनी काढून टाकल्यानंतर, दुसरी किडनी सामान्यांपेक्षा किंचित जास्त वाढते. जितके जास्त उरले तितके किडनीला जास्त रक्तपुरवठा होतो आणि ती शरीरातील घाण गाळते. यासोबतच किडनी दाता सामान्य जीवन जगतो.

तज्ज्ञांच्या मते, किडनी दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होतो, हा केवळ भ्रम आहे. अभ्यास दर्शवितो की, किडनी दान करणारे लोक सरासरी लोकसंख्येपेक्षा जास्त काळ जगतात. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, 85 टक्के दाते किडनी दिल्यानंतर 20 वर्षे कसे जगले. याचे कारण असे असू शकते की केवळ निरोगी लोकांनाच दाता बनण्याची परवानगी आहे. किंवा किडनी दान केल्यानंतर दाते आरोग्याची अतिरिक्त काळजी घेतात.

‘आझाद मराठी’चा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा