साधूग्रामसाठीचे भूसंपादन, रस्ते कामांना गती द्यावी – Eknath Shinde

साधूग्रामसाठीचे भूसंपादन, रस्ते कामांना गती द्यावी - Eknath Shinde

Eknath Shinde  | नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा  सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईल, असे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, कुंभमेळा व अन्य अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार किशोर दराडे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळ, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

शिंदे ( Eknath Shinde) म्हणाले की, कुंभमेळ्यासाठीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानुसार  देशभरातून होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करताना रस्त्यांचा आवश्यक तेथे विस्तार करावा. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घेताना जल प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मल:निस्सारण, जलशुद्धीकरणाचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावेत. त्यासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीसाठी प्रयत्न केले जातील. कुंभमेळा कालावधीत होणारी भाविकांची गर्दी पाहता सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणेचे बळकटीकरण करावे. त्यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी समन्वयाने नियोजन करावे.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून तेथे केलेल्या उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून त्याचा कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी उपयोग होऊ शकेल. यावेळी उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी  रामकालपथ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मोनोरेलचाही आढावा घेतला.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, गोदावरी नदी पात्रात दूषित सांडपाणी सोडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगितले. आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा शून्य अपघात, सुखद आणि अध्यात्मिक होण्यासाठी तसेच नाशिक शहराला जागतिक पातळीवर आणून अर्थव्यवस्थेस चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच कुंभमेळ्यासाठीच्या कामांचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या पाहणीसाठी अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार श्रीमती फरांदे यांनीही विविध सूचना केल्या, तर महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या | Atul Londhe

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याला उंदीर चावल्याच्या घटनेनंतर नीलम गोऱ्हेंची तत्काळ दखल

मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार

Previous Post
२०१९ पूर्वीच्या गाड्यांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक; ३१ मार्चची अंतिम मुदत

२०१९ पूर्वीच्या गाड्यांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक; ३१ मार्चची अंतिम मुदत

Next Post
रणवीर अलाहबादियावर संतापला WWE चा माजी कुस्तीगीर, दिली धमकी

रणवीर अलाहबादियावर संतापला WWE चा माजी कुस्तीगीर, दिली धमकी

Related Posts

सुपाऱ्या घेवून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना पुन्हा इथे बोलावू नका; जाणून घ्या चित्रा वाघ का भडकल्या?

यवतमाळ: राज्यातील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh)…
Read More
Ramiz Raja : पाकिस्तानला आता सतत हरण्याची सवय झाली आहे; रमीझ राजाने पाकिस्तानी संघाला झापलं

Ramiz Raja : पाकिस्तानला आता सतत हरण्याची सवय झाली आहे; रमीझ राजाने पाकिस्तानी संघाला झापलं

Ramiz Raja On Pakistan Cricket Team: विश्वचषकापूर्वी सराव सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात न्यूझीलंडने…
Read More
'आदिल माझा नग्न व्हिडीओ विकायचा...', पतीच्या आरोपांवर चिडली राखी सावंत, केले गंभीर आरोप

‘आदिल माझा नग्न व्हिडीओ विकायचा…’, पतीच्या आरोपांवर चिडली राखी सावंत, केले गंभीर आरोप

रिअॅलिटी शो क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा वादात सापडली आहे. आदिल खान दुर्रानीसोबतचे (Adil Khan Durrani)…
Read More