कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईळे भूमिपुत्र, उद्योजकांचेही नुकसान; आमदार लांडगे यांची स्पष्ट भूमिका

कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईळे भूमिपुत्र, उद्योजकांचेही नुकसान; आमदार लांडगे यांची स्पष्ट भूमिका

Mahesh Landge | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडी-चिखली परिसरात अतिक्रमण कारवाई केली. इंद्रायणी नदी प्रदूषण, शहर आणि देशाची सुरक्षेचया मुद्यावर अवैध भंगार व्यावसायिक आणि बेकायदेशीर धंद्यांवर केलेल्या कारवाईचे आम्ही समर्थन करीत आहोत. मात्र, सरसकट कारवाईमुळे लघु उद्योजक आणि भूमिपुत्रांचेही नुकसान झाले आहे. याचे समर्थन कदापि करणार नाही. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी मांडली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडी-चिखली भागात भारतातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई केली. पहिल्या दिवशी दि. 8 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2025 दरम्यान एकूण 4 हजार 111 अतिक्रमणांवर कारवाई झाली. यामध्ये एकूण 3 कोटी 60 लाख 58 हजार 746 चौरस फूट क्षेत्रावरील म्हणजे सुमारे 827 एकर क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. या कारवाईमुळे रस्ता आणि आरक्षण असलेले महापालिका मालकीचे सुमारे 100 एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त झाले आहे.

आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून कुदळवाडी-चिखली परिसरातील अनधिकृत भंगार व्यावसायिक, अवैध धंदे आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी भूमिका आम्ही सातत्त्याने मांडत आलो आहोत. इंद्रायणी प्रदूषण, वायू व ध्वनी प्रदूषण, अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि आगीच्या घटना यांना प्रतिबंध करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर कारवाईसाठी महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाला पाठबळ दिले. याबाबत मुख्यमंत्री आणि प्रशासनाचेही आभार व्यक्त करतो.

… म्हणून जाहीर भूमिका मांडली नाही!
अनधिकृत भंगार व्यावसायिक आणि अवैध धंद्यांवर यासह रस्ते आणि आरक्षणांमधील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे ठरले होते. त्या कारवाईचे आम्ही जाहीर समर्थन करीत आहोत. परंतु, प्रशासनाने केलेल्या सरसकट कारवाईमुळे 559 लघु उद्योजक आणि भूमिपुत्रांचे नुकसान झाले आहे. याचे आम्ही कदापि समर्थन करणार नाही. याबाबत महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे दाद मागणार आहोत. दि. 7 फेब्रुवारी 17 फेब्रुवारी 2025 दरम्यान अतिक्रमण कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल. या कारणास्तव ‘सोशल मीडिया’ किंवा जाहीरपणे भूमिका व्यक्त न करता प्रशासनाला सहकार्य करण्याचे ठरले होते. त्यामुळे आता स्पष्ट भूमिका मांडत आहोत, असेही आमदार लांडगे (Mahesh Landge) यांनी ‘सोशल मीडिया’द्वारे मत व्यक्त केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवस्मारक केवळ घोषणांपुरते! महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान थांबवा! शरद पवार पक्षाची निदर्शने

तुमच्याकडे परिवारवाद तर आमचा महाराष्ट्रवाद!, शिंदे यांचा रत्नागिरीतून उबाठावर हल्लाबोल

मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त व्हावा! लांडगे यांची मागणी

Previous Post
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतावर सरस राहिलाय पाकिस्तान, वाचा आतापर्यंतच्या लढतींचे निकाल

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतावर सरस राहिलाय पाकिस्तान, वाचा आतापर्यंतच्या लढतींचे निकाल

Next Post
हमे बाज बनना है धोकेबाज नहीं; एकनाथ शिंदे यांचे पदाधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश

हमे बाज बनना है धोकेबाज नहीं; एकनाथ शिंदे यांचे पदाधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश

Related Posts
Chandrashekhar Bawankule | मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार?

Chandrashekhar Bawankule | मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार?

Chandrashekhar Bawankule |आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो…
Read More
गिरीश बापटांच्या भेटीला अमित शहा येणार, कसब्यातील समीकरणे बदलणार!

गिरीश बापटांच्या भेटीला अमित शहा येणार, कसब्यातील समीकरणे बदलणार!

पुणे : पुण्यात सध्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी या पोटनिवडणुकांकडे विशेष…
Read More

‘त्या’ वादग्रस्त विधानाबाबत आमिर खान म्हणाला, ‘मी माफी मागतो…’

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खानने काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली…
Read More