मुंबई | राज्यात लव्ह जिहाद ( Love Jihad Special Committee) आणि फसवणूक, बळाचा वापर करून होणाऱ्या धर्मांतरणाला आळा घालण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय करणार विशेष समिती?
राज्यातील लव्ह जिहाद व जबरदस्तीच्या धर्मांतरणाच्या घटनांचा अभ्यास करणे.
इतर राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवणे.
नव्या कायद्याचा मसुदा तयार करणे.
समितीमध्ये कोण असणार?
पोलीस महासंचालक (अध्यक्ष)
महिला व बालविकास विभागाचे सदस्य
अल्पसंख्याक विकास विभाग सचिव
विधी व न्याय विभाग सचिव
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सदस्य
गृह विभाग सदस्य सचिव व अन्य सदस्य
यापूर्वी भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटका, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि झारखंड या नऊ राज्यांनी ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदे लागू केले आहेत. महाराष्ट्र हे असा कायदा करणारे देशातील दहावे राज्य ( Love Jihad Special Committee) ठरणार आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या | Atul Londhe
मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार