विधानपरिषद निवडणूक : पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांच्या पदरी निराशा; भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली – विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC election) भाजपने आपल्या चार उमेदरवांची नावे निश्चित (BJP decide four names for MLC Vidhan Parishad Election) केली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपले चार उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ (Pankaja Munde and Chitra Wagh) यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. दरम्यान, भाजपने पाचवा उमेदवार दिल्याने आता राज्यसभे पाठोपाठ विधानपरिषदेची सुद्धा निवडणूक होऊ शकते. दरम्यान, शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी यांच्या नावांची घोषणा केली आहे.