बिबट्याची कातडी तस्करी करणारी टोळी अटकेत; गोंदिया आणि नागपूर वनविभागाची संयुक्त कारवाही

गोंदिया – गोंदिया जिल्हा वनसंपदेने नटलेला जिल्हा. जिल्हात मोठ्या प्रमाणात वन्यजीव यांच्या वावर असतो. जिल्हात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांची हत्या झाल्याचे समोर आले. अशातच गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे वन्यजीव बिबट्याची कातडी आणि अवयव यांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली.

या माहितीच्या आधारे  वनविभागीय वन अधिकारी ( दक्षता ) नागपूर आणि गोंदिया वन विभाग द्वारा सालेकसा  तहसील कार्यालयच्या पटांगणाजवळ सापळा रचून वन्यजीव बिबट्याच्या अवयवाची विक्री करण्याऱ्या 12 आरोपींना अटक केली आहे.

त्यांच्याकडून बिबट कातडी 1 नग, बिबट पंजे नख सहित 4 नग, बिबट सुळे दात तुटलेले 2 नग व इतर 13 नग, बिबट मिश्या 10 नग , आणि 3 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावणी आहे.