मोदींच्या घरासमोर हनुमान चालिसा, नमाज पठण करु द्या, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची मागणी

मुंबई – राज्यातील जनता सध्या अनेक संकटाचा सामना करत असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र नको त्या विषयात आपला बहुमुल्य वेळ वाया घालवताना दिसत आहेत. राज्यात अनेक भागात पाण्याची टंचाई ( Water scarcity ) आहे. विजेची समस्या ( Electricity problem ) आहे, इंधन दरवाढ ( Fuel price hike ) आदी समस्या असताना हनुमान चालीसा (Hanuman Chalisa ) हा नेत्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे असं दिसत आहे.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा ( (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) ) यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचनाचा धरलेला आग्रह आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक हा मुद्दा चर्चेत असताना आता राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याने थेट मोदींच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa outside Modi’s residence ) म्हणण्यासाठी परवानगी मागितली आहे.

पंतप्रधानांच्या घरासमोर हनुमान चालिसा आणि नमाज पठणाची मुभा द्या’ ( Allow Hanuman Chalisa and Namaz to be recited )  अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी फहमिदा खान (fahmida Khan) यांनी केली आहे. या मागणीसाठी फहमिदा खान यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. राष्ट्रवादीच्या या महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या निवासस्थानासमोर नमाज, हनुमान चालिसा, दुर्गा चालिसा, नवकार या मंत्रांचे पठण करण्याची परवानगी मागितली आहे.

 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Union Home Minister Amit Shah ) यांना लिहिलेल्या या पत्रात फहेमीदा हसन म्हणतात, मला माझ्या प्रिय देशाच्या लाडक्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर नमाज, हनुमान चालिसा, दुर्गा चालिसा, नवकार मंत्र, गुरु ग्रंथ आणि नोविनो यांचे पठण करण्याची परवानगी देण्यात यावी. यासाठीचा दिवस आणि वेळ देखील आपण सुचवावा.’ फहेमीदा हसन या राष्ट्रवादी पक्षाच्या कांदिवली विभागाच्या कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी थेट अमित शाह यांना लिहिलेले हे पत्र चर्चेत आले आहे.