राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे; शिवरायांना अजित पवारांचे वंदन

राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे; शिवरायांना अजित पवारांचे वंदन

ShivJayanti 2025 | छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करून रयतेचे स्वराज्य स्थापन केले आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवत त्यांनी अटकेपार झेंडा फडकवण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत आणि ताकद महाराष्ट्राला दिली,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी (ShivJayanti 2025) जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीने प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन जपला. महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचे श्रेय सर्वार्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला  हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना वंदन केले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनाही वंदन केले असून, शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शब्दात राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवस्मारक केवळ घोषणांपुरते! महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान थांबवा! शरद पवार पक्षाची निदर्शने

तुमच्याकडे परिवारवाद तर आमचा महाराष्ट्रवाद!, शिंदे यांचा रत्नागिरीतून उबाठावर हल्लाबोल

मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त व्हावा! लांडगे यांची मागणी

Previous Post
जितेंद्र आव्हाड यांना दणका! दोन कट्टर शिलेदारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

जितेंद्र आव्हाड यांना दणका! दोन कट्टर शिलेदारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Next Post
भाजपा चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष पदी राजीव पाटील; प्रदेश सरचिटणीस पदी केतन महामुनी यांची निवड

भाजपा चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष पदी राजीव पाटील; प्रदेश सरचिटणीस पदी केतन महामुनी यांची निवड

Related Posts

सुपाऱ्या घेवून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना पुन्हा इथे बोलावू नका; जाणून घ्या चित्रा वाघ का भडकल्या?

यवतमाळ: राज्यातील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh)…
Read More
Chandrashekhar Bawankule | दंगली घडू नये यासाठी पुढाकार घ्या; बावनकुळे यांचे शरद पवारांना आवाहन

Chandrashekhar Bawankule | दंगली घडू नये यासाठी पुढाकार घ्या; बावनकुळे यांचे शरद पवारांना आवाहन

Chandrashekhar Bawankule | निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडणार, असे विधान करण्यापेक्षा शरद पवारांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांनां थांबवण्यासाठी…
Read More

फडणवीस तर चड्डीतच असतील; पुण्येश्वर मंदिर मुद्द्यावरुन रुपाली पाटील ठोंबरेंनी सुनावले खडेबोल

पुणे- कसबा विधानसभा पोटनिवडणूक अवघ्या काही तासांवर (Kasba Bypoll Election) आली आहे. हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी…
Read More