खरी शिवसेना कोणती हे ठरविण्याची मुभा केंद्रीय निवडणूक आयोगाला द्या – शिंदे

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. दोन्ही बाजूंनी आमचीच खरी शिवसेना (Shiv Sena) आहे असा दावा केला जात आहे. यामुळे नेमकी खरी शिवसेना कुणाची हा सवाल उपस्थित केला जात आहे. खरी शिवसेना कोणती या वादावर निर्णय घेण्याची मुभा केंद्रीय निवडणूक आयोगाला ( Central Election Commission) द्यावी, असं प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.

शिंदे सरकारची वैधता, खरी शिवसेना कोणाची या मुद्दय़ावर निवडणूक आयोगापुढील वाद तसंच आमदार अपात्रता या मुद्दय़ांवर शिवसेना नेत्यांनी सादर केलेल्या याचिका फेटाळून लावाव्यात, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयास केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर केवळ 15 आमदार असून आपल्यामागे 40 आमदार आहेत. ठाकरे यांच्याबरोबर असलेल्या 15 आमदारांचा गट 40 आमदारांना बंडखोर ठरवून अपात्र ठरविण्याची मागणी करू शकत नाही. शिवसेनेतील आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बैठकीत लोकशाही पद्धतीने आणि बहुमताने पक्षांतर्गत निर्णय घेतले. त्या निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Courtहस्तक्षेप करू नये, अशी विनंती शिंदे यांनी न्यायालयास केली आहे.