‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडे बिग बॉसची पुढची स्पर्धक सहभागी होणार ?

मुंबई – ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखलं जाते. गेली चार वर्षे श्रेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतंच श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोमुळे ती बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस’ मराठी ३ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या बिग बॉसमध्ये अनेक स्पर्धक वाईल्ड कार्डद्वारे सहभागी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच बिग बॉसमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे.