वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ – Hemant Rasane

वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ - Hemant Rasane

Hemant Rasane : वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ असे सांगतानाच ” अधिकाऱ्यांनी येथे काय साहित्य व इतर सुधारणा करायच्या आहेत त्याची यादी त्वरित द्यावी” अश्या सूचना नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी दिल्या.

आज देव दिवाळीच्या निमित्ताने आणि हेमंतभाऊ आमदार पदी निवडून आल्याच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट च्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत विविध उपयोगी साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,माजी नगरसेवक राजेश येनपुरे,ग्लोबल ग्रुप चे संजीव अरोरा, नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट चे मनोज हिंगोरानी,मनपा विद्युत विभागाच्या प्रभारी मुख्य अभियंता मनीषा शेकटकर,उपअभियंता जयदीप अडसूळ,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त सतीश कोंढाळकर व विद्युतदाहिनीतील कर्मचारी उपस्थित होते.

आमचे स्नेही मित्र हेमंत रासने यांचा पोटनिवडणूकीतील पराभव जिव्हारी लागला होता असे संदीप खर्डेकर म्हणाले. ही सल भरून निघाल्यावर फ्लेक्स लावून अभिनंदन करण्यापेक्षा लोकोपयोगी कार्य करून हेमंतभाऊंचे अभिनंदन करावे, शुभेच्छा द्याव्यात असा विचार करून आज देवदिवाळी च्या दिवशी वैकुंठ स्मशानभूमीत कपाट, टेबल खुर्च्या व इतर साहित्य भेट देताना मनस्वी आनंद होत असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.
वैकुंठात सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून मी ही मदत कार्य करत असतो मात्र संदीप खर्डेकर हे गेली पस्तीस वर्षे (35 ) वैकुंठात सेवाकार्य करत असतात याबद्दल त्यांचे पुणेकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो अश्या शब्दात हेमंत रासने यांनी क्रिएटिव्ह फौंडेशन चा गौरव केला. तसेच मनपा च्या अधिकारी मनीषा शेकटकर यांना ” रक्षा विसर्जनासाठीचा गाडा व अन्य आवश्यक साहित्य मी उपलब्ध करून देईन ” असे सांगतानाच, वैकुंठातील कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी नमूद केले.

भावी काळात शहरातील सर्वच स्मशानभूमीत जे जे साहित्य लागेल ते नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने देण्यात येईल असे मनोज हिंगोरानी व मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन केले.

Previous Post
भाजपकडे गृहमंत्रीपद मागणार का? एकनाथ शिंदे यांनी सांगितली मनातली गोष्ट | Eknath Shinde

भाजपकडे गृहमंत्रीपद मागणार का? एकनाथ शिंदे यांनी सांगितली मनातली गोष्ट | Eknath Shinde

Next Post
थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ

थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ

Related Posts
ब्रिजभूषण यांच्यावर रागातून लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची कबुली!

ब्रिजभूषण यांच्यावर रागातून लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची कबुली!

ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधातील महिला कुस्तीपटूंच्या आंदोलना बाबतीत गुरुवारी म्हणजेच ८ जून रोजी एक नवा…
Read More

‘या’ व्यक्तीने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार, अदानी-अंबानींनाही सोडले मागे

हैदराबादचा उद्योगपती नासिर खान सतत चर्चेत आहे. नासिर खान (Naseer Khan) देशातील सर्वात महागड्या कारचा मालक बनला आहे.…
Read More
महाराष्ट्र होणार आणखी गतिमान: एकनाथ शिंदे सरकारने घेतला रस्ते विकासाबाबत मोठा निर्णय

महाराष्ट्र होणार आणखी गतिमान: एकनाथ शिंदे सरकारने घेतला रस्ते विकासाबाबत मोठा निर्णय

मुंबई – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारा निधी आरईसी (REC) लिमीटेड…
Read More