नकारात्मक भूतकाळ विसरून आता उगवत्या लख्ख पहाटेचे स्वागत करू – नीलम गोऱ्हे

नकारात्मक भूतकाळ विसरून आता उगवत्या लख्ख पहाटेचे स्वागत करू - नीलम गोऱ्हे

पुणे : कोरोना महामारीचे काळे ढग दूर सारून नाट्य कला साहित्य क्षेत्रात आता पुन्हा एकदा कलेच्या अवकाशात पुन्हा एकदा इंद्रधनुष्य खुलेल, असा विश्वास महाराष्ट्र शासनाच्या विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.नीलम गो-हे यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाने 22 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील तमाम नाट्यगृह खुली करण्याचा स्वागतार्ह निर्णय जाहीर केला आहे. त्याला अनुसरून सर्व नाट्यगृह आजपासून सुरु होत आहेत, ह्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी संवाद पुणेतर्फे नटराज पूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संवाद पुणेचे सुनील महाजन,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, अभिनेत्री लीला गांधी आदी सिने-नाट्य सृष्टीतील कलाकार, रंगमंच मागील कलाकार आणि तंत्रज्ञ मोठ्य़ संख्येने उपस्थित होते.

डाॅ. नीलम गो-हे म्हणाल्या, कोरोना सारख्या महामारी मुळे गेली दीड-दोन वर्षे सांस्कृतिक क्षेत्र झाकोळले गेले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी घडणा-या पुणेकरांना घरात कोंडून घ्यावे लागले. यामुळे कलाकार तर त्रस्त झालेच त्याच बरोबर रसिक पुणेकरांना देखील खूप त्रास झाला. या काळात अनेकांना मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागले. लोकांनी आत्महत्या सारखे पाऊल लावण्यापर्यंत विचार केला. पंरतू हा सगळा नकारात्मक भूतकाळ विसरून आता उगवत्या लख्ख पहाटेचे स्वागत करायचे आहे.

अभिनेत्री लीला गांधी यांनी देखील यावेळी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यासंचालिका निकिता मोघे यांनी आभार मानले.

हे ही पहा:

https://youtu.be/lbCAx3D6bzQ

Previous Post
डेलकर कुटुंबीयांनी केला होता शिवरायांच्या पुतळ्यास विरोध; आता भाजप उभारणार भव्य अश्वारूढ पुतळा 

डेलकर कुटुंबीयांनी केला होता शिवरायांच्या पुतळ्यास विरोध; आता भाजप उभारणार भव्य अश्वारूढ पुतळा 

Next Post
पुणे महापालिकेकडून मिळकत कराची दामदुपटीने वसुली, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे जाहीर निषेध

पुणे महापालिकेकडून मिळकत कराची दामदुपटीने वसुली, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे जाहीर निषेध

Related Posts
आदित्य ठाकरे

आपली चूक एवढीच झाली की आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिलं – आदित्य ठाकरे 

रत्नागिरी : आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीमध्ये आयोजित सभेमध्ये त्यांनी शिंदे गट…
Read More
aaditya thackeray

इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मीतीत जगात आघाडी घ्यावी – आदित्य ठाकरे

पुणे : जगाला आज हरित ऊर्जेची गरज असून प्रदूषण रोखणे आणि त्या माध्यमातून हवामान बदलाचा सामना करण्यासाठी इलेक्ट्रिक…
Read More

“देशात फक्त सेक्स आणि शाहरुख विकला…”, पठाण सुपरहिट झाल्यानंतर नेहा धुपियाचे जुने विधान चर्चेत

Mumbai- ‘बॉलीवूडचा बादशाह’ शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. पहिल्याच…
Read More