राहुल गांधींप्रमाणे पद गमावलेल्या नेत्यांची यादी पाहिली का? लालुंसह भाजप नेत्याचा देखील आहे यात समावेश 

Rahul Gandhi :  सूरत न्यायालयाने गुरुवारी (23 मार्च) वायनाडमधील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी’ आडनावाबाबत बदनामी प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हा निकाल देताना न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे.  यातच आता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत राहुल गांधी म्हणाले होते की सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? या कमेंटवरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी या टिप्पणीवर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधींचे वक्तव्य संपूर्ण मोदी समाजाचा अपमान करणारे असून संपूर्ण मोदी समाजाची बदनामी करणारे आहे, असे म्हटले होते.

यापूर्वी खासदारकी रद्द झालेल्या नेत्यांची यादी  
राहुल गांधी यांच्याप्रमाणे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांची सदस्यता रद्द करण्यात आली होती. याशिवाय समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांचं देखील नाव या यादीत आहे. या यादीत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचं देखील नाव आहे. मुजफ्परनगर दंगलीप्रकरणी भाजपाचे आमदार विक्रम सैनी दोषी आढळले होते. त्यामुळे त्यांना विधानसभेची सदस्यता गमवावी लागली.