Loksabha Election | लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election | लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

पुणे |  जिल्ह्यात आज मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे (Loksabha Election) मतदान झाले. विविध मतदान केंद्रावर परदेशातून खास मतदान करण्यासाठी आलेले मतदारदेखील पहावयास मिळत होते. डॉ. किरण तुळसे यांनी लंडनवरून येवून आपला मतदानाचा हक्क बजावून स्थानिक नागरिकांसमोर मतदानाचा हक्क बजावण्याचे एक आदर्श उदाहरण दिले.

पिंपरी चिंचवड मधील डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूलमध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत.

आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे, हा विचार त्यांना मनात सतत येत होता. प्रत्येकाच्या एकेका मताने लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) मतदानासाठी आलो आहे, असे डॉ. तुळसे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Eknath Shinde | काँग्रेसवाले भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Eknath Shinde | काँग्रेसवाले भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Next Post
Eknath Shinde | घाटकोपर येथील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

Eknath Shinde | घाटकोपर येथील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

Related Posts
Uddhav Thackeray & Corona

कोविडसंकट काळात ‘या’ योजनेमुळे मिळाला आदिवासी बांधवांना दिलासा

पुणे – कोविडसंकट काळात शासनाने खावटी अनुदान योजना सुरू केल्याने आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे १२…
Read More
Ashish Shelar | हिंदू हिताचे बोलणाऱ्यांना संपविण्याचे षडयंत्र, आरक्षण न देणाऱ्यांवर जरांगे का बोलत नाहीत?

Ashish Shelar | हिंदू हिताचे बोलणाऱ्यांना संपविण्याचे षडयंत्र, आरक्षण न देणाऱ्यांवर जरांगे का बोलत नाहीत?

Ashish Shelar | ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिले नाही, किंबहूना ज्यांनी मिळालेले आरक्षण घालवले, त्यांच्या विरोधात जरांगे…
Read More
पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; केसरकरांना सरकारचा धक्का

पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; केसरकरांना सरकारचा धक्का

मुंबई | राज्यातील शालेय शिक्षण विभागाने माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या कार्यकाळात घेतलेले ‘वह्यांची पाने’ आणि…
Read More