सर्वसामान्यांना दिलासा! गॅस सिलिंडर धारकांसाठी सरकारचा नवा निर्णय, आता सर्वांना मिळणार गॅस सबसिडी

LPG Gas Subsidy : देशात महागाई शिगेला पोहोचली आहे. इंधन आणि गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरखर्च सांभाळणे कठीण झाले आहेत. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक बोजा पडत आहे. गॅस सिलिंडरच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्र सरकार गॅस सिलिंडर खरेदीवर अनुदान देत होते. मात्र, सध्या हे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

वाढत्या गॅसच्या किंमती पाहता मिडल क्लास माणूस अक्षरश: हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारने यंदाच्या नवीन वर्षाचा अर्थसंकल्प (Union Budget) जाहीर केला असला तरी वाढत्या महागाईबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून (Modi Government) नवनवे निर्णय घेतले जात आहेत. गॅस सिलिंडर सबसिडीबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. गॅस सिलिंडर धारकांसाठी केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. गरीब लोकांसाठी गॅस सिलिंडरचे अनुदान पुन्हा सुरू करण्याचा सरकार विचार करत असल्याचे बोलले जात आहे.

सरकारने गॅस सिलिंडर अनुदानाबाबत निर्णय घेतल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकारकडून लवकरच गॅस सबसिडी जाहीर केली जाऊ शकते.