अखेर एकनाथ शिंदेंनी ‘तो’ निर्णय घेतलाच; ठाकरेंसह संजय राऊत यांना मोठा धक्का 

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून (Shiv Sena) आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेकडून संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावरुन गच्छंती करण्यात आली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे. गजानन कीर्तिकर हे सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते. सध्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेकडून किर्तीकर संसदेत व्हीप काढू शकतात. म्हणजेच, किर्तीकरांचा व्हीप संजय राऊतांनी न पाळल्यास अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते. अपात्रतेची कारवाई झाल्यास राऊतांची खासदारकीही जाऊ शकते.