Breaking : भाजप आमदाराच्या मुलाला ४० लाखांची लाच घेताना पकडले; आमदाराच्या घरातही 6 कोटी सापडले

Breaking : बंगळुरू जल आपूर्ती आणि सीवरेज बोर्ड (बीडब्ल्यूएसएसबी) चे मुख्य लेखापाल प्रशांत मदल यांना कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी ४० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांतने निविदा काढण्यासाठी कोणाकडून 81 लाख रुपयांची मागणी केली होती.प्रशांत हे चन्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदाराचे सुपुत्र आहेत. या कारवाईनंतर आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली असून घरातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे.

आमदार विरुपक्ष्पा यांच्या अधिकारी असलेल्या मुलाने ४० लाख रुपयांची लाच घेतल्यामुळे त्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आता आमदार महोदयांच्या घरावरही लोकायुक्तांनी धाड टाकली असून ६ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. तर, मुलाच्या कार्यालयातून २ कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.

दरम्यान, कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड कंपनीच्या अध्यक्षपदाचा भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी राजीनामा दिला आहे. केएसडीएलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना ते म्हणाले की,  लोकायुक्तांच्या छाप्याशी माझा कोणताही संबंध नाही. हे माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरुद्धचे षड्यंत्र आहे, परंतु माझ्यावर आरोप केले जात आहेत, त्यामुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.