Mahesh Landge | इंद्रायणीनगर परिसरातील सर्व सेक्टरमधील मालमतांची मालकी पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) होती. या सर्व मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मोठा पाठपुरावा केला. अधिवेशनात लक्षवेधी मांडली आणि मालमत्ता फ्री होल्ड करून घेतल्या. त्याबाबतचा शासन निर्णय देखील आणला. आम्ही स्वतःच्या घराचे मालक झालो. त्यामुळे आम्ही आमदार लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांची विजयाची हॅट्ट्रिक होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा विश्वास महिलांनी व्यक्त केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. सेक्टर 13 पासून गाठीभेटींना सुरुवात झाली. राजमाता जिजाऊ, सारा, स्पाईन चौकात आमदार लांडगे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सेक्टर 11, 9, 6, 4, 3, 7, 2, 1 या परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या. ठिकठिकाणी महिलांनी आमदार लांडगे यांचे औक्षण केले. महिला, युवक, युवती, जेष्ठ सर्वांनी मोठ्या उत्साहाने आमदार लांडगे यांचे स्वागत केले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, प्रतापमामा मोहिते, योगेश लांडगे, शिवराज लांडगे, योगेश लोंढे, हनुमंत लांडगे, निखिल काळकुटे, कुंदन काळे, पंकज पवार, बाबुराव लोंढे यांच्यासह ग्रामस्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मला खुर्चीचा सोस नाही; महाराष्ट्र सुजलाम व सुफलाम करायचाय, राज ठाकरे यांचे प्रतिपादन
कल्याणकारी योजना काँग्रेस आघाडी बंद करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका