Madhuri Misal | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेतेमंडळी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. विधानसभेची तयारी म्हणून भाजपकडून पुण्यातील मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देण्यात यावी? यासाठी चाचपणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारीसाठी मतदान घेण्यात आले. यात पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना पसंती दर्शवल्याचे दिसून आले.
पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपला अनुकूल वातावरण असल्याने काही भाजपमधील नेते इच्छुक असल्याचे दिसून आले होते, मात्र आता या इच्छुकांना पक्षातील त्यांच्याच सहकाऱ्यांनी काय संदेश द्यायचा तो मतांच्या स्वरुपात दिला आहे. भाजपकडून काल पक्ष निरीक्षकांच्या माध्यमातून बंद लिफाफ्यात पदाधिकाऱ्यांकडून पसंतीच्या तीन उमेदवारांची नावे घेण्यात आली. यात सर्वाधिक पदाधिकाऱ्यांकडून पर्वतीच्या ३ वेळच्या आमदार माधुरी मिसाळ यांनाच पसंती दिल्याचे दिसून आले.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपचे श्रीनाथ भिमालेदेखील इच्छुक असल्याचे समजत आहे. अशातच आता स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पसंतीवरुन उमेदवार निवडला जातो की, नवा गडी उतरवला जातोय़ हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने आणि धीरज घाटे यांच्या समर्थकांमध्ये पोस्टरवॉर
राहुल गांधींच्या हस्ते कसबा बावड्यातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार | Rahul Gandhi
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच; ६४ हजार बेपत्ता भगिनी संदर्भात सरकारने खुलासा करावा | Nana Patole