Mohan Yadav | काँग्रेसच्या भूलथापांना मतदार फसणार नाहीत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा विश्वास

Mohan Yadav | काँग्रेसच्या भूलथापांना मतदार फसणार नाहीत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा विश्वास

Mohan Yadav | सत्ता असताना 100 वेळा घटनेत दुरुस्त्या करणाऱ्या काँग्रेसला संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होत आहे. गरीबी हटाव चे आश्वासन अनेक वर्षे सत्ता भोगूनही पूर्ण न करणाऱ्या काँग्रेसला आजही पुन्हा तेच आश्वासन द्यावे लागत आहे. मात्र देशाचा मतदार काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी शनिवारी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत यादव बोलत होते.

भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी नकली शिवसेनेच्या प्रचारात सहभागी झाल्याचे पाहून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना होत असतील, अशा शब्दांत यादव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. यादव म्हणाले की, बहुमताच्या बळावर मागच्या 10 वर्षांत भाजपा-एनडीए सरकारने वेगाने देशाचा विकास आणि देशहिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांमुळे आमच्यावर टीका करता येत नसल्याने विरोधक अपप्रचार करत फिरत आहेत. भाजपा-एनडीए ने 400 जागांवर विजय मिळवला तर देशाचे संविधान धोक्यात येईल असा आरोप करताना काँग्रेसला त्यांनीच तब्बल 100 वेळा संविधान बदल केल्याचा सोयीस्कररित्या विसर पडतो. 1950 मध्ये संविधान लागू झाल्यापासून पं. नेहरूंच्या राजवटीत 11 वेळा, इंदिरा गांधींनी 17 वेळा तर राजीव गांधींच्या राजवटीतच 10 वेळा संविधानात बदल केले गेले होते याची श्री. यादव यांनी आठवण करून दिली. आणीबाणी लागू करून संविधान, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम काँग्रेसनेच केले असे सांगून ते म्हणाले की संविधान बदलाच्या काँग्रेसच्या खोट्या अपप्रचारावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत.

अनेक दाखले देत यादव यांनी एनडीए,महायुती आणि युपीए ,मविआ सरकार या दोहोंमधला फरक दाखवून दिला. एकीकडे सागरी सेतू, मेट्रो, पूल, रस्ते बांधणारे, कलम 370 हटवून जम्मू काश्मीरच्या जनतेला न्याय देणारे, ट्रिपल तलाक प्रथा बंद करून मुस्लीम महिलांचा सन्मान राखणारे, जातपात न पाहता सर्वांसाठी गरीब कल्याणाच्या योजना राबवणारे भाजपा-एनडीए, महायुती सरकार आहे. तर दुसरीकडे सदैव विकासकामात खोडा घालणारे, मुंबईची मेट्रो रोखणारे आणि संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून अपप्रचार करणारे मविआ आणि युपीए सरकार आहे. विरोधक समजतात तशी जनता दुधखुळी नाही. मतदानाच्या पाचव्या टप्प्यात विकसित भारतासाठी भाजपा-एनडीए आणि महायुतीच्या उमेदवारांना मत देऊन मतदार विरोधकांना धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Uddhav Thackeray | भाजपाला आता आरएसएसचीही गरज नाही, १०० वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे

Uddhav Thackeray | भाजपाला आता आरएसएसचीही गरज नाही, १०० वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे

Next Post
IPL 2024 Playoffs Schedule | धोनीच्या स्वप्नांचा चुराडा, तर कोहलीच्या ट्रॉफीच्या अपेक्षा उंचावल्या; पाहा प्लेऑफचे वेळापत्रक

IPL 2024 Playoffs Schedule | धोनीच्या स्वप्नांचा चुराडा, तर कोहलीच्या ट्रॉफीच्या अपेक्षा उंचावल्या; पाहा प्लेऑफचे वेळापत्रक

Related Posts
मुरलीधर मोहोळांना विविध स्तरातून वाढता पाठिंबा; प्रचारातही घेतली जोरदार आघाडी 

मुरलीधर मोहोळांना विविध स्तरातून वाढता पाठिंबा; प्रचारातही घेतली जोरदार आघाडी 

Murlidhar Mohol:- पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी उमेदवारी जाहीर झालेल्या दिवसापासून प्रचारात…
Read More
Dattatray Bharne

राज्यात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे काहीही घडू शकतं; दत्तात्रय भरणे याचं सूचक वक्तव्य

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात…
Read More
T20 World Cup 2024 | टी20 विश्वचषकात रोहित शर्माच असेल भारताचा कर्णधार, जय शाहची घोषणा; उपकर्णधाराचे नावही सांगितले

टी20 विश्वचषकात रोहित शर्माच असेल भारताचा कर्णधार, जय शाहची घोषणा; उपकर्णधाराचे नावही सांगितले

T20 World Cup 2024: रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2024 ( T20 World Cup 2024) मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व…
Read More