परळी | महादेव मुंडे खून प्रकरणाचा (Mahadev Munde murder case) तपास नव्याने सुरू करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणासाठी विशेष पथक नेमले आहे.
21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची हत्या (Mahadev Munde murder case) झाली होती. मात्र दीड वर्ष उलटूनही आरोपी अटकेत नाहीत. त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली.
त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर तपास पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवण्यात आला. विशेष पथकाने परळीमध्ये झाडाझडती घेतली असून आता हा तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या | Atul Londhe
मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार