संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीनं आझाद मैदानात महापंचायतीचं आयोजन

मुंबई –  संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीनं आझाद मैदानात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं आहे. आझाद मैदानात मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेत मजूर दाखल होत आहेत. मोदी सरकारनं मागे घेतलेले शेतकरीविरोधी कायदे संसदेत मागे घेतल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल असं येथील उपस्थित शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सोबतच मालाला एमएसपी देखील देण्याची मागणी पुढे येत आहे. सुमारे १० ते १५ हजार जणांची संख्या आज उपस्थित असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, तत्पूर्वी कानून वापसी तो घर वापसी अशी घोषणा करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. सरकार ने तिन्ही कृषी कायदे रद्द केले असताना शेतकरी नेत्यांनी आंदोलन थांबविले पाहिजे.तरीही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना भडकवीणाऱ्या राकेश टिकेत सारख्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

आठवले म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहेत.कृषी कायदे रद्द केल्याने आता शेतकऱ्यांनी आंदोलन थांबविले पाहिजे. कायदे रद्द केल्यास आंदोलन थांबविणार असा शब्द शेतकरी नेत्यांनी दिला होता तो शब्द शेतकरी नेत्यांनी पाळला नाही. ही गद्दारी आहे.नीतिमत्ता नसलेल्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे.