Deepak Kesarkar | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. पण असं असलं तरीही अद्यापही सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. दरम्यान, आता नव्या सरकारचा शपथविधी हा 5 नोव्हेंबरला होणार हे जाहीर करण्यात आलं असलं तरी महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
अशातच शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सोमवारी (2 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्याबाबत सूचक वक्तव्य केलं. यात त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली गेली. त्यांचा मान राखला गेला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
शिंदे गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याच्या मुद्यावर बोलताना केसरकर म्हणाले, “शिंदे हे कुठल्याही पदासाठी आग्रही नाहीत. दोन्ही नेत्यांनी बरोबरीने काम केलेलं आहे. त्यांचा मान राखला गेला पाहिजे असं वाटतं. आता हा मान कसा राखायचा हे दिल्लीनं ठरवायचं आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शपथविधीपूर्वी सागर बंगल्यावर हालचालींना वेग, शरद पवारांच्या खासदाराची फडणविसांशी भेट
भाजपकडे गृहमंत्रीपद मागणार का? एकनाथ शिंदे यांनी सांगितली मनातली गोष्ट | Eknath Shinde