Maharashtra Budget 2023 : पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ होणार

मुंबई – महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प आज सादर केला गेला. राज्य शासनाच्या खजिन्यातून नागरिकांसाठी नेमकी किती आर्थिक तरतूद केली जाणार याकडे लक्ष लागले असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या घोषणा यावेळी त्यांनी केल्या आहेत.

सशक्त युवा…. खेळांना प्रोत्साहन
– खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध
– बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार
– पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार
– हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान
– नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा – पर्यटनाला चालना…
– प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण
– पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास
– 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारणार
– राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार. यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश

पर्यावरणपूरक विकास
– राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
– 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
– भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार
– जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती
– शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट
– हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात 75,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
– 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार
– 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत
– एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस
– डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार
– पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार
– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम
– प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची अमृत वन उद्यानांची निर्मिती
– ग्रामीण भागात कडूनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल असे पंचायतन
– धार्मिक स्थळाच्या परिसरात देवराई
– औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी 50 हायटेक रोपवाटिका
– गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी, पक्षी उद्यान यावर्षी
– शिवनेरी (जुन्नर) येथे बिबट सफारी