Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात फडणवीसांनी केल्या शेतकऱ्यांसाठी ‘या’ महत्वाच्या घोषणा

मुंबई – केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर केला गेला. राज्य शासनाच्या खजिन्यातून नागरिकांसाठी नेमकी किती आर्थिक तरतूद केली जाणार याकडे लक्ष लागले असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनेक महत्वाच्या घोषणा यावेळी त्यांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प होता.

– मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, संभाजीनगरा येथील उद्यानांचा विकास

– राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी

– शिवकालीन किल्ले संवर्धनासाठी 300 कोटी

– पंचामृत -श्वावत शेती, महिला ओबीसी मागास वर्ग विकास, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मित, पर्यावरण पुरक विकास

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये

– आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी

– मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये

– शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये

– प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेत भर. नमो शेतकरी महा सन्मान योजना. शेतकऱ्यांना सहा हजार देणार. केंद्रसह १२ हजार रुपयांचा लाभ मिळणार.

– शेतकऱ्यांचा पीक विमा सरकार भरणार. नमो शेतकरी योजनेची सरकारकडून घोषणा.

– शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ६ हजार ९०० कोटी रुपयांची घोषणा.