Maharashtra Budget 2023 : महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार

मुंबई – महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प आज सादर केला गेला. राज्य शासनाच्या खजिन्यातून नागरिकांसाठी नेमकी किती आर्थिक तरतूद केली जाणार याकडे लक्ष लागले असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या घोषणा यावेळी त्यांनी केल्या आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार

– महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
– त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार
– नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
– मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत
– राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा

– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी देणार
– संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध करून देणार
– छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपये
– असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
– लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
– गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
– रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
– वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
– ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
– प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार