Maharashtra Elections 2022 : 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर

Mumbai – १७ जिल्ह्यांमधील तब्बल ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका (Elections for 92 Municipal Councils and 4 Nagar Panchayats in 17 districts announced) जाहीर करण्यात आल्या आहेत. पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आज जाहिर केला.

या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने या निवडणुकादेखील ओबीसींच्या आरक्षणाशिवाय पार पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर,कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92  नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे.