शिंदे-फडणवीस सरकारची महत्त्वाच्या प्रकरणाचे तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची तयारी

मुंबई – महाराष्ट्रात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Sarkar) यांनी कामांचा धडाका लावला आहे सोबतच  ठाकरे सरकारचे (Thackeray Sarkar) अनेक निर्णय रद्द केले आहेत. दरम्यान, यातच आता नव्या सरकारनं महत्त्वाच्या प्रकरणाचे तपासही महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) हातून काढून सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह इतर 28 जणांविरोधात दाखल झालेला खंडणीचा गुन्हा तसंच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना (Rashmi Shukla) अडचणीत आणणारा फोन टॅपिंग अहवाल (Phone Tapping Case) लीक प्रकरणाशी संबंधित गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे.