Maharashtra Kesari : पराभवानंतरही होतेय त्याचीच चर्चा; हमालाचा पोरगा ते जिगरबाज कुस्तीपटू असा आहे सिकंदरचा प्रवास

पुणे : नांदेडच्या शिवराज राक्षेने (shivraj rakshe ) सोलापूरच्या महेंद्र गायकवाड (mahendra gaikwad) याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महेंद्र गायकवाड याला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिद्रा थार ही गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला मानाची गदा, ट्रक्टर व रोख अडीच लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले. शिवराज जिंकला त्याचे कौतुक होतच आहे. पण सेमी फायनलमध्ये महेंद्रकडून पराभूत झालेल्या सिकंदर शेखची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

मातीवरची फायनल आणि महाराष्ट्र केसरीची सेमी फायनल कुस्ती महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखमध्ये झाली. यात महेंद्रला जास्त पॉईंट मिळाल्यामुळे सिकंदरचा पराभव झाला.सिकंदरच्या कुस्ती निर्णयात न्यायी भुमिका घेतली गेली नाही. खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सोबतच सिकंदर वर अन्याय झाल्याचे देखील काहींचे म्हणणे आहे.

हमालाचा पोरगा ते कुस्तीपटू असा सिकंदरचा प्रवास राहिलेला आहे.लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. सैन्यदलाकडून खेळत तो अनेक मैदाने जिंकत आहे. आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडीलांची इच्छा त्याने पुर्ण केली आहे.