Shivraj Rakshe | अहिल्यानगर येथे 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या 67व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादग्रस्त निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. गादी विभागातील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात ( Shivraj Rakshe) झालेल्या कुस्तीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पंच नितीश कबालिये यांच्यावर कारवाई करत त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेनेचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला?