दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या पहिल्या दिवशी परिक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ( MNS Pune) वतीने रांगोळी व औक्षणासह सनई चौघड्याच्या जयघोषात मंगलमय वातावरणात गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले. बाजीराव रोडवरील नुमवि प्रशालेत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी म.न.वि.से.राज्य ( MNS Pune) कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ म्हणाले, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे मोठे दडपण असते. हे दडपण कमी झाल्यास ते उत्तम कामगिरी करू शकतील, या भूमिकेतून गेल्या ८ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत.
यावेळी नुमविचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, माजी नगरसेविका सुशीला नेटके, आशिष देवधर, ज्योती खुटवड, आरती सहाणे, रुपेश चांदेकर, करण मेहता, दिलीप वाघमारे, सुरेश सांबार, ऋषिकेश करंदीकर, जयश्री पाथरकर, प्रतिक्षा रणधीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन म.न.वि.से.चे राज्य कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांनी केले होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल
‘हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा’, बॉलीवूड गायकाचं थेट योगींना आव्हान
गजा मारणेच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण; मुरलीधर मोहोळ यांचा संताप