उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर | Uday Samant

उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर | Uday Samant

Uday Samant | राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, उद्योजकांना उपलब्ध करुन दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा, औद्योगिक वसाहतीत केलेली पायाभूत सुविधांची कामे यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आली असून उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणूकीत प्रथम क्रमांकावर आहे असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत ( Uday Samant)  यांनी केले.

‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या उद्योग विभागाच्यावतीने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवाजी पाटील, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, मुख्य अभियंता नितीन वानखेडे यावेळी उपस्थित होते.

मी स्वत: उद्योजक असून उद्योजकांच्या अडचणींची आणि त्यांच्या समस्येची मला चांगली जाणीव आहे असे सांगून उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले, महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम उद्योग विभागातर्फे राबविण्यात आलेल्या योजनांची पारदर्शकता दाखविणारा आहे. उद्योगांसाठी शासन सकारात्मक आहे. महाराष्ट्रात सात ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान आणि मोठया उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागतच आहे. उद्योग क्षेत्रात पुरुषांसोबतच महिलाही पुढाकार घेत आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळे एकही उद्योग राज्याबाहेर गेला नाही. उद्योग विभागावर केलेल्या टिकेमुळे महाराष्ट्राचे नुकसान होते हे टिका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे असे त्यांनी सांगितले केले.

औद्योगिक क्षेत्रात जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुतवणूक आली असून परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चून राज्यातील २८९ औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. बीडकीन औद्योगिक क्षेत्रात ५२ हजार कोटी रुपयांची, एक लाख कोटी रुपयांची विदर्भात तसेच कोकण औद्योगिक क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेद्वारे महिलांना शासनातर्फे आर्थिक मदत करण्यात येते. ही रक्कम बाजारात येण्यामुळे त्याचा उद्योग क्षेत्राला फायदा होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत १० नवीन उद्योजकांना उद्योगमंतत्र्यांच्याहस्ते पाच कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले.
उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपचे बहुमताने सरकार येणार, रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

वडगावशेरीत ‘आप’चा उमेदवार ठरला, प्रशांत केदारी लढवणार विधानसभा निवडणूक

विधानसभेच्या १२ जागांबाबत तडजोड नाही : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

Previous Post
हरीयाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपचे बहुमताने सरकार येणार, रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपचे बहुमताने सरकार येणार, रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

Next Post
पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी | CM Eknath Shinde

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी | CM Eknath Shinde

Related Posts
Sharad Pawar

आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला कसा जाईल असा प्रयत्न करुया; शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

मुंबई – सत्ता केंद्रीत करणारा प्रयत्न ताकद देण्याचा असू शकतो परंतु जनता बोलत नाही ती बघत असते, निरीक्षण…
Read More
बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना भारतरत्न किताब देवून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा | Ramdas Athawale

बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना भारतरत्न किताब देवून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा | Ramdas Athawale

Ramdas Athawale | बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी अनमोल मदत केली. महाविद्यालयीन शिक्षण…
Read More
Jalgaon Train Accident | ट्रेनमधील चहा विक्रेत्याचं एक वाक्य अन् होत्याचं नव्हतं झालं

Jalgaon Train Accident | ट्रेनमधील चहा विक्रेत्याचं एक वाक्य अन् होत्याचं नव्हतं झालं

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील (Jalgaon Train Accident) मृत 12 प्रवाशांमध्ये 8 पुरुष,…
Read More