Maharashtra Vidhan Parishad Election Result : राज्यात विधान परिषद निवडणुकीचे मतदान आज (12 जुलै) पार पडले. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गुप्त पद्धतीने या निवडणुकीसाठी मतदान झाले असून सर्वच्या सर्व 274 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आजच या निवडणुकीचा निकालही स्पष्ट होणार आहे.
दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. भाजपचे योगेश टिळेकर यांनी पहिल्याच पसंतीत 23 मते मिळवत विजयश्री फडकावली. योगेश टिळेकरांनंतर आता भाजपाच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही 26 मते मिळवत विजयाचा गुलाल उधळला आहे. पंकजा मुंडे तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा आमदार झाल्या आहेत. लोकसभेतील नजीकच्या पराभवानंतर हा विजय त्यांच्यासाठी महत्वाचा मानला जातोय. याशिवाय भाजपचे अमित गोरखे यांनीही 23 मते मिळवत विजय मिळवला आहे.
पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हेदेखील विजयी झाले आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप