महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने केवळ ‘या’ आश्वासनावर दिला भाजपला गोव्यात पाठींबा

पणजी – गोव्याच्या मंत्रीमंडळानं काल विधानसभा विसर्जित करण्याचा ठराव मंजूर केला. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, हा ठराव सोमवारी राज्यपालांकडे पाठवला जाईल, त्यानंतर नव्या आमदारांची बैठक घेतली जाईल. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपत आहे.

सावंत म्हणाले की सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक गोव्यात येणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर म्हणाले, भाजपा कोणताही राजकीय पक्ष फोडणार नाही, असं आश्वासन घेतल्यानंतर आपण भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

40 सदस्य असलेल्या गोवा विधानसभेत भाजपाला 20 तर काँग्रेसला 11 जागा मिळाल्या आहेत. एमजीपी आणि आम आदमी पार्टीनं प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. तीन अपक्षांनीही विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. गोवा फॉरवर्ड पार्टी आणि रिवोल्युशनरी गोवन्स पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळाली.