“मी दारुच्या नशेत माझ्या मुलीला किस करायला जवळ गेलो आणि…”, महेश भट्टने सांगितला किस्सा

अलीकडेच बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट अरबाज खानच्या शो ‘द इनव्हिसिबल्स’मध्ये पोहोचले. यादरम्यान त्यांनी आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले. या मुलाखतीत महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी दारूचे व्यसन आणि दारूपासून मुक्ती कशी मिळवली? यासारख्या विषयांवर चर्चा केली. महेश भट्ट यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी त्यांना दारूचे व्यसन होते. यामुळे अनेकवेळा त्यांना पत्नी सोनी राझदानच्या रोषाला सामोरे जावे लागले.

शाहीनमुळे दारू सोडली
महेश भट्ट यांना दारूचे व्यसन होते, मग त्यांनी दारू सोडली कशी? यावर थेट संवाद साधताना ते म्हणासे, “माझी मुलगी शाहीनचा जन्म झाला तेव्हा बदल झाला होता. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, तेव्हा शाहीनला मी उचलून घेतले होते. पण जसजसे मी तिचे चुंबन घेण्यासाठी जवळ गेलो, तेव्हा मला असे वाटू लागले की जणू ती माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. तिला दारूचा वास सहन होत नव्हता. ती लहान होती म्हणून ती दारूचा वास सहनही करू शकली नसती. तेव्हापासून मी दारू पिणे बंद केले.”

महेश भट्ट फूटपाथवर झोपलेले
यादरम्यान महेश भट्ट यांनी दारूच्या नशेत फुटपाथवर पडलेल्या प्रसंगाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, “एक दिवस जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मला मी जेव्हीपीडी स्किमच्या फूटपाथवर झोपलेलो दिसलो. मला आठवते की मी जमिनीवर होतो आणि पहाटेची वेळ होती. मला समजले की मी कोणत्यातरी पार्टीला गेलो होतो आणि मग तिथेच पडलो. रस्त्यात खाली पडलो आणि झोपी गेलो. मला घरापर्यंत चालत गेल्याचही आठवतं. त्यावेळी मी सोनी (राझदान) सोबत राहत होतो.”