XUV घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, महिंद्रा घेऊन येत आहे XUV 700चे स्वस्त मॉडेल !

नवी दिल्ली : चिप शॉर्टेजमुळे (Chip Shortage) वाहन कंपन्यांची अवस्था वाईट आहे. ऑटो कंपन्या (Auto Companies) बाजारातील मागणी पूर्ण करू शकत नाहीत, त्यामुळे अनेक मॉडेल्सचा वेटिंग पीरियड (Waiting Period) एक वर्षापेक्षा जास्त वाढला आहे. महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) यातून अनोखा तोडगा काढला आहे. कंपनी नुकत्याच लाँच झालेल्या SUV XUV 700 चे स्वस्त वर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या वर्जनमध्ये (Feature)काही फीचर्स नसतील.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, XUV 700 चे AX7 स्मार्ट वैरिएंट AX7 L पेक्षा 80,000 रुपयांनी स्वस्त असू शकते. कंपनी यामध्ये एडीएएस (ADAS), नी एअरबॅग (Knee Airbag), इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (Electronic Parking Brake), स्मार्ट डोअर हँडल्स (Smart Door Handles) आणि वायरलेस चार्जर यांसारखी काही फीचर काढून टाकू शकते. ही सर्व प्रीमियम वैशिष्ट्ये XUV 700 च्या AX7 L प्रकारात उपलब्ध आहेत.

सध्या कंपनीने या लॉन्चबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. या नवीन व्हर्जनमध्ये 10.25-इंचाचा डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ब्लाइंड-व्ह्यू मॉनिटरिंग, हाय-बीम असिस्ट सारखी फीचर्स राहतील अशी माहिती आहे . याला सोनीची 12 स्पीकर ऑडिओ सिस्टीम देखील दिली जाईल असा अंदाज आहे. हे वैरिएंट 200PS 2-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 155/185PS 2.2-लिटर डिझेल इंजिनसह उपलब्ध असू शकते.

महिंद्रा एक्सयूवी 700चे (Mahindra XUV 700) हे व्हेरिएंट सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध होणार नाही. हे फक्त तेच ग्राहक बुक करू शकतात ज्यांनी आधीच AX7 L बुक केले आहे. कंपनीने या वैरिएंटमध्ये अशा काही चिप्स आणि सेमीकंडक्टर वापरलेले नाहीत, जे अजून उपलब्ध नाहीत. यामुळे कंपनीला वेटिंग पीरियड कमी करण्यास मदत होईल. चिप आणि सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे, या वैरिएंटमध्ये मध्ये काही फीचर कमी करण्यात आली आहेत, ज्यामुळे कंपनी तिच्या सुपीरियर वैरिएंटपेक्षा याची किंमत सुमारे 80 हजार रुपये कमी ठेवू शकते.