पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी ( Pimpri-Chinchwad Cyber Police) ऑनलाइन फसवणुकीच्या विविध प्रकरणांमध्ये मोठी कारवाई करत १०२ सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. बनावट गुंतवणूक, बँकिंग फसवणूक, हॅकिंग आणि सोशल मीडिया फसवणुकीसह अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये हे आरोपी सहभागी होते.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात, राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांत पोलिसांनी धडक कारवाई करून आरोपींना अटक केली.जयपूरमध्ये अटक कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत आरोपींना ताब्यात घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामगिरीची दखल घेऊन पोलिसांचे कौतुक केले.पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
या कारवाईमुळे सायबर गुन्ह्यांविरोधात ( Pimpri-Chinchwad Cyber Police) पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज मोहीम यशस्वी ठरली आहे. नागरिकांनी ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!
शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण