Satyajit Tambe | छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात ‘छावा’चे शो हाऊसफुल होत आहेत. मात्र या चित्रपटाच्या तिकिटांच्या दरांमुळे सामान्य मराठी प्रेक्षकांना तो पाहणे कठीण जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची व बलिदानाची गाथा अनुभवण्याची संधी महाराष्ट्रातील नागरिकांना मिळाली यासाठी ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी एक्स वर पोस्ट करत केली आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहिले आहे. सध्या देशभरात गाजत असलेल्या “छावा” चित्रपटाच्या माध्यमातून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची व बलिदानाची गाथा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी महाराष्ट्रातील नागरिकांना मिळाली आहे. ही संधी सर्वांना घेता यावी यासाठी आज शिवजयंतीचे औचित्य साधून “छावा” चित्रपट करमुक्त करावा, ही राज्य सरकारला नम्र विनंती.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शिवस्मारक केवळ घोषणांपुरते! महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान थांबवा! शरद पवार पक्षाची निदर्शने
तुमच्याकडे परिवारवाद तर आमचा महाराष्ट्रवाद!, शिंदे यांचा रत्नागिरीतून उबाठावर हल्लाबोल
मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त व्हावा! लांडगे यांची मागणी