मलायका आणि अर्जुनने ब्रेकअपच्या बातम्यांना दिला पूर्णविराम

मुंबई : अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malika Arora) एकमेकांना ३ वर्षांपासून डेट करत आहेत. हे दोघेअनेकदा एकत्र पाहायला मिळतात. दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ब्रेकअपच्या बातम्या येत असतानाच  ते दोघे रोमँटिक व्हेकेशनवर गेले आहेत. दोघांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अर्जुन कपूर त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरी फोटोमध्ये त्याचे शरीर फ्लॉंट करताना दिसत आहे आणि त्याचा चेहरा अर्धाच दिसत आहे. त्याचवेळी, दुसऱ्या एका फोटोमध्ये अर्जुन कपूर खुर्चीवर आराम करत आहे. त्याचवेळी मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे तीन फोटो आणि दोन व्हिडिओ शेअर केले आहेत.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा काही गैरसमजामुळे एकमेकांशी बोलत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, ब्रेकअपच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे दिसून येत आहे. त्याच वेळी, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या फोटो मधील बॅकग्राउंड पाहिल तर असे दिसते की हे जोडपे समुद्रकिनाऱ्यावर आहे. सध्या या दोघांनीही एकमेकांचे फोटो शेअर केलेले नाहीत.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर याआधी त्यांच्या नात्यावर बोलले नाहीत पण आता दोघेही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलत आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनीही त्यांच्या वयातील फरकाबाबत अनेकदा बोलले आहे. कामाबद्दल बोलायचे झाले तर अर्जुन कपूर शेवटचा ‘भूत पोलिस’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतमी यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय अर्जुन कपूर जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारियासोबत दिग्दर्शक मोहित सूरीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.