मल्ल्या लंडनमधील बंगल्यातून देखील होणार बेघर, आणखी एक मोठा दणका

भारतातील फरार आणि कर्जबुडव्या विजय मल्ल्याला इंग्लंडमध्ये देखील बेघर होण्याची वेळ आली आहे. लंडनमध्ये विजय मल्ला यांचे एक आलीशान असे घर आहे. मात्र कर्ज परतफेडीवरुन ब्रिटिश न्यायपालिका आणि विजय मल्ला यांच्यामध्ये वाद झाले.स्विस बँकेचे देखील मल्ल्या यांनी कर्ज थकविले आहे. हा वाद अधिकच चिघळला आहे. कोर्टाने मल्ल्याला आता घर रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. नाराज मल्ल्याने लंडनमधील हायकोर्टात दाद मागितली आहे ,पण त्याला तिथे देखील हाती निराशा लागली आहे.

लंडनच्या घरातून बाहेर काढण्यात येऊ नये ही त्यांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आदेशाचे पालन करण्यास बंदी घालावी ही त्यांची विनंती न्यायालयाने नामंजूर केली. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की मल्ल्या कुटुंबाला थकबाकी भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यास कोणताही आधार नाही. मल्ल्याने सदर स्विस बँकेकडून 2.04 दशलक्ष पौंडचे कर्ज घेतले आहे. सध्या मल्याची 95 वर्षीय आहे त्या घरात राहत आहे.

विजय मल्ल्यावर भारतात देखील अनेक खटले सुरू आहेत. त्यांच्या अनेक प्रॉपर्टीचा लिलाव देखील करण्यात आला आहे. आता पर्यत मल्ल्याची 739 कोटी रुपयांची प्रॉपर्टी विकली असून त्यातून कर्ज वसूली करण्यात आली आहे. विजय मल्ल्यावर 17 भारतीय बँकांचे कर्ज आहे. त्याने अजून देखील ते फेडले नाही. 2016 पासून विजय मल्ल्या भारतातून फरार आहे.