अयोध्या : नदीत स्नान करताना पतीने पत्नीचे चुंबन घेतले, लोकांनी तरुणाला धु धु धुतले 

अयोध्या – अयोध्येत भव्य राम मंदिर (Ayodhya Ram Temple) बांधले जात आहे. अशा स्थितीत अनेक भाविक तेथे दर्शनासाठी जातात. मात्र येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे पती-पत्नी शरयू नदीत (Sharyu River) स्नान करत होते. दरम्यान, पतीने पत्नीचे उघड्यावर चुंबन घेतले. मात्र तिथे उपस्थित लोकांच्या नजरा त्याच्यावर गेल्या. यावर लोकांनी आक्षेप घेत पतीला मारहाण (Beating) केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये तरुण पती-पत्नी सरयू नदीत लोकांमध्ये स्नान करताना दिसत आहेत. यादरम्यान पतीने पत्नीचे चुंबन घेतले. हे चुंबन एवढं जड जाईल की नवऱ्याला मारहाण होईल याचा विचारही त्यांच्या पत्नीने केला नसेल. चुंबन घेतल्यावर एकामागून एक युवक त्या त्या स्त्रीच्या नवऱ्याला मारहाण करू लागतात आणि काही सेकंदात या प्रक्रियेचे सामूहिक मारहाणीत रूपांतर होते. सरयू नदीला वॉटर पार्क मानणे हा या नव्या जोडप्यासाठी असा धडा बनला आहे की ते आयुष्यभर विसरणार नाहीत.

ही घटना मंगळवारी घडली. सरयू नदीच्या काठावर मंगळवारी योगा-दिनानिमित्त योगाभ्यास करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Union Minister Bhupendra Yadav) यांनीही हजेरी लावली. मंत्री गेल्याच्या दोन तासांनी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा यासंबंधीचे दोन व्हिडिओही समोर आले. यामध्ये पती आंघोळ करताना पत्नीचे चुंबन घेताना दिसत आहे. दुसऱ्यामध्ये त्याला मारहाण केली जात आहे.