भाजपचा हसन मुश्रीफ यांना धोबीपछाड; मातब्बर नेत्याने भाजपात केला प्रवेश
कागल – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल शहराच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी व त्यांचे पती कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचे भाजपमध्ये कोल्हापुरातील नागाळा पार्कमधील निवासस्थानी स्वागत केले.
कागल तालुक्यातील मुश्रीफ गटाला मोठा धक्का भाजपने दिला आहे.दरम्यान रमेश माळी हे हसन मुश्रीफ गटातील निष्ठावंत मानले जायचे. दरम्यान मागच्या निवडणूकीच्या वेळी समरजीत घाटगे यांच्याहातून थोडक्यात नगरपालिकेची सत्ता गेली होती. रमेश माळी मागच्या कित्येक महिन्यांपासून नाराज असल्याचीही चर्चा होती. माळी यांना मुश्रीफ गटातीलच काही नेत्यांनी नाराज केल्याचीही चर्चा आहे.