Manipal Hospital Kharadi : मणिपाल हॉस्पिटल खराडी ठरले हर्णिया केअर मधील महाष्ट्रातील पहिले ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’

Manipal Hospital Kharadi : पुणे शहरांतील खराडी येथे असलेल्या मणिपाल हॉस्पिटलला (Manipal Hospital) नवी दिल्ली येथे हर्णिया सोसायटी ऑफ इंडिया द्वारे आयोजित करण्यात आलेल्या यंग हिस्कॉन कॉन्फरन्स मध्ये ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारचा प्रतिथयश पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे.

हा पुरस्कार हॉस्पिटल ला त्यांच्या गुणवत्तेचे एचएसआय, क्लिनिकल केअर आणि रुग्णांच्या समाधानाच्या मानकांनुसार देण्यात आला आहे. या पुरस्काराला पात्र होण्यासाठी हॉस्पिटल ला हर्णिया सोसायटी ऑफ इंडिया कडून तयार करण्यात आलेल्या कठोर मानकांचे पालन करणे आवश्यक होते. एचएसआय मध्ये अर्ज केल्यानंतर त्यांच्या कार्यकारी समितीने पायाभूत सुविधांचा अभ्यास करुन यांतील काही महत्त्वपूर्ण घटकांचा जसे स्वच्छता, कर्मचार्‍यांचे व्यवस्थापन, ओटीएस आणि रुग्णांचे रेकॉर्ड्स इत्यादींचा अभ्यास केला.

या मान्यतेविषयी बोलतांना मणिपाल हॉस्पिटल खराडीचे बॅरिॲट्रिक ॲन्ड मिनिमली इन्व्हेझिव्ह सर्जरी चे कन्सल्टंट डॉ. सुधीर जाधव यांनी सांगितले “ एचएसआय चा सेंटर ऑफ एक्सेलन्स ॲवॉर्ड’ हा परिश्रम, सातत्य आणि कठोर निकषांचे पालन केल्यानंतर प्राप्त झाला आहे, यामुळे हे सुनिश्चित होते की आम्ही नेहमीच आमच्या रुग्णांना शक्य तेवढी सर्वोत्कृष्ट सेवा देतो. हा पुरस्कार केवळ माझाच नव्हे तर हॉस्पिटलच्या सर्व कर्मचार्‍यांचा असून त्यांनी रुग्णांचे जीवन सुधारण्यासाठी खूपच कष्ट घेतले आहेत. हा सन्मान मिळालेले महाराष्ट्रातील पहिले हॉस्पिटल ठरणे आमच्यासाठी अभिमानाची बाब असून आम्ही नेहमीच रुग्णांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहू.”

पुण्यातील खराडी येथील मणिपाल हॉस्पिटल चे हॉस्पिटल डायरेक्टर श्री परमेश्वर दास यांनी सांगितले “ मणिपाल हॉस्पिटल तर्फे नेहमीच सर्वसमावेशक आणि एकात्मिक काळजी, सर्वोत्कृष्ट पध्दती देऊन रुग्णांसाठी सर्वोत्कृष्ट निष्कर्श देऊ करत असतो. तंत्रज्ञानाचा प्रत्येक घटक हा रुग्णांचे निष्कर्श अधिक चांगले करत असतो, त्याच बरोबर आमचे वैद्यकीय कर्मचारी सक्षम होऊन नाविन्य आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देत असतात. हा पुरस्कार म्हणजे परिश्रमाचे सार्थक होऊन रुग्णांविषयीची वचनबध्दता दर्शवतो. आम्ही नेहमीच सर्वोत्कृष्ट क्लिनिकल निष्कर्श देण्यावर भर देत असतो आणि एचएसआय च्या ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ ही तर रुग्णांना केंद्रस्थानी ठेऊन सर्वोत्कृष्ट क्लिनिकल उत्कृष्टता देण्याची सुरुवात आहे.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप