सत्तेसाठी किती ही लाचारी; मनीषा कायंदे यांची राज ठाकरेंवर टीका 

मुंबई : शिवसेना (MLA Manisha Kayande) आमदार मनीषा कायंदे यांनी  मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेवर टीका केली आहे. (BJP-MNS) भाजप-मनसे युतीची चर्चा रंगली असून सत्तेसाठी किती ही लाचारी असं म्हणत त्यांनी मनसेवर टीका केली आहे.

आता खऱ्या अर्थाने हिंदूत्वाचा (Hinduism) मुखवटा कशासाठी घातला हे देखील सर्वसामान्यांच्या लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजप-मनसे युतीबाबत त्यांनी दोन्ही पक्षावर सडकून टीका केली असून हे सर्व सत्तेसाठी चालले असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. TV9सोबत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

गरज निर्माण होईल अशी मनसेने आतापर्यंत आपली भूमिका बदलेली आहे. ही बाब आता सर्वसामान्यांच्याही लक्षात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी हिंदूत्व मुद्द्याला हात घातला होता. हे सर्व कशासाठी ते आता लक्षात येत आहे. भाजप-मनसे युतीबाबतच्या घडामोडी ह्या अचानक नाहीतर खूप पूर्वीपासूनच्या असल्याची टीकाही कायंदे यांनी केली आहे. हिंदूत्वाचा मुखवटा कशासाठी घेतला होता हे गेल्या दोन दिवसांच्या हालचालीवरुन निदर्शनास येत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.