राणा दाम्पत्य म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेत बंटी-बबली होय – मनीषा कायंदे

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge from Lilavati Hospital) देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज (Open Challenge) दिलं आहे.तसेच त्यांनी इतर मुद्द्यावरून देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांना शिवसेनेकडून आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांच्याकडून आता प्रत्युत्तर देण्यात आले आहे. खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)व आमदार रवी राणा (Ravi Rana) आमच्या सर्वसामान्यांच्या दृष्टीनं बंटी-बबली (Bunty -Bubly) आहे. त्या म्हणाल्या, आतमध्ये तीन दिवस हॉस्पीटलमध्ये रडत होत्या. चहा मिळाला नाही, पाणी मिळाले नाही पण तेही सगळं कळलं लोकांना त्यांचा खोटारडे पणा बाहेर पडला. मात्र आता रुग्णालयातवून बाहेर येताच दोन तास माध्यमाच्या समोर उभे राहून बोलल्या.

ज्यांना आतमध्ये उभे राहता येत नव्हेत त्या नवनीत राणा बाहेर पत्रकारांच्या समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uadhav Thakarey) यांना आव्हान देत आहेत. मात्र असे ठाकरे सरकारला आव्हान देणारे किती आले अन किती गेले. त्यांनी हा बालिश पण सोडून द्यावा. नारी शक्तीवर ते बोलत आहेत. तर त्यांनी महागाई (Inflation) वाढली आहे त्यावर बोलावे. असे बोलून त्या न्यायालयाने (Court)घालून दिलेल्या समजेचा गैरवापर करत आहेत. अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली आहे.